अयोध्यापती "श्रीराम" सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापू के कर्ता गुरु है।

Tuesday 17 April 2018

Wednesday 11 April 2018

रामाचा पाळणा - बाळा जो जो रे

April 11, 2018 0
रामाचा पाळणा




बाळा जो जो रे कुळभूषणा । दशरथनंदना ।
निद्रा करि बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ॥धृ॥

पाळणा लांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशी ।
पुत्र जन्मला हृषीकेशी । कौसल्येचे कुशी ॥१॥

रन्तजडित पालखी  । झळके अलौकिक ।
वरती पहुडले कुलदिपक । त्रिभुवननायक ॥२॥

हालवी कौसल्या सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ।
पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जती जयजयकारी ॥३॥

विश्‍वव्यापकां  रघुराया । निद्रा करी बा सखयां  ।
तुजवर कुरवंडी करुनिया । सांडिन आपुली काया ॥४॥

येऊनि वसिष्ठ सत्वर । सागे जन्मांतर ।
राम परब्रम्ह  साचार । सातवा अवतार ॥५॥

याग रक्षुनिया अवधारा । मारुनि रजनीचरा ।
जाईल सीतेच्या स्वयंवरा । उद्धरि गौतमदारा ॥६॥

परिणिल जानकी सुरुपा । भंगुनिया शिवचापा ।
रावण लज्जित महाकोपा  । नव्हे पण हा सोपा ॥७॥

सिंधूजलडोही अवलीळा । नामे तरतिल शिळा ।
त्यावरी उतरुनिया दयाळा । नेईल वानरमेळा ॥८॥

समूळ मर्दूनि रावण । स्थापिल बिभीषण ।
देव सोडविल संपूर्ण । आनंदेल त्रिभुवन ॥९॥

राम भावाचा भुकेला । भक्ताधीन झाला ।
दास विठ्ठले ऎकिला । पाळणा गाईला ॥१०॥
Read more...

श्रीरामरक्षा स्तोत्रं

April 11, 2018 0
श्रीरामरक्षा स्तोत्र

श्री गणेशायः नमः।


अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य । बुधकौशिक ऋषि: 
श्रीसीतारामचन्द्रो देवता । अनुष्टुप्छन्द: । सीता शक्ति: 
श्रीमान् हनुमान् कीलकम् 
श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोग: ।



अथ ध्यानम्

ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं 
पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।

वामाङ्कारूढसीतामुखकमलविलल्लोचनं नीरदाभं 
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् ॥



इति ध्यात्वा ।  


चरितं रधुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटापुकुटमण्डितम् ॥२॥

सासितूणधनुर्बाणपार्णि नक्तञ्चरान्तकम् ।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥३॥

रामरक्षां पठेत प्राज्ञ: पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघव: पातु भालं दशरथात्मज: ॥४॥

कौसल्येयो द्दशौ पातु विश्वामित्रप्रिय: श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल: ॥५॥

जिह्वां विद्यानिधि: पातु कण्ठं भरतवन्दित: ।
स्कन्धौ दिव्यायुध: पातु भुजौ भग्नेशकार्मुक: ॥६॥

करौ सीतापति: पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय: ॥७॥

सुग्रीवेश: कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु: ।
ऊरू रघूत्तम: पातु रक्ष:कुलविनाशकृत् ॥८॥

जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तक: ।
पादौ विभीषणश्रीद: पातु रामोऽखिलं वपु: ॥९॥

एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठेत् ।
स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥

पातालमूतलव्योमचारिणश्छद्मचारिण: ।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि: ॥११॥

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् ।
नरो न लिप्यते पापैर् भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥१२॥

जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् ।
य: कण्ठे धारयेत्तस्य करस्था: सर्वसिद्धय: ॥१३॥

वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञ: सर्वत्र लभते जयमङ्गलम् ॥१४॥

आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर: ।
तथा लिखितवान् प्रात: प्रबुद्धो बुधकौशिक: ॥१५॥

आराम: कल्पवृक्षाणां विराम: सकलापदाम् ।
अभिरामस्त्रिलोकानां राम: श्रीमान् स न: प्रभु: ॥१६॥

तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्वरौ ॥१७॥

फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥१८॥

शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।
रक्ष: कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥१९॥

आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रत: पथि सदैव गच्छताम् ॥२०॥

संनद्ध: कवची खङ्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन्मनोरथोऽस्माकं राम: पातु सलक्ष्मण: ॥२१॥

रामो दाशरथि:  शूरो लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थ: पुरुष: पूर्ण: कौसल्येयो रघूत्तम: ॥२२॥

वेदान्तवेद्यो यज्ञेश: पुराणपुरुषोत्तम: ।
जानकीवल्लभ: श्रीमानप्रमेयपराक्रम: ॥२३॥

इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्त: श्रद्धयान्वित: ।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशय: ॥२४॥

रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरा: ॥२५॥

रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापति सुन्दरं
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धामिंकम् ।
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति 
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥२८॥

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम: ॥२७॥

श्रीराम राम रघुनन्दन राम राम
श्रीराम राम भरताग्रज राम राम
श्रीराम राम रणकर्कश राम राम
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि
श्रीरामचन्द्रचरणौ  वचसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ  शिरसा नमामि 
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥२९॥

माता रामो मत्पिता रामचन्द्र: 
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र: ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं 
जाने नैव जाने न जाने ॥३०॥

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥३१॥

लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् ।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ॥३२॥

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥३३॥

कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥३४॥

आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥३५॥

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम् ।
तर्जनं यमद्‌तानां रामरामेति गर्जनम् ॥३६॥

रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे 
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं 
रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥३७॥

राम रामेति रामेति रमे मनोरमे ।
सहस्रनामतत्तुल्यं रामनाप वरानने ॥३८॥



इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् ।

॥ श्रीसितारामचंद्रार्पणमस्तु ॥ 
Read more...

HD WALLPAPER - गुरुकृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कछु मानत नाही

April 11, 2018 0
गुरुकृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कछु मानत नाही ॥
अंदर रामा बाहर रामा। सपने में देखत सीतारामा॥
जागत रामा सोवत रामा। जहा देखे वहां पूरनकामा॥
एका जनर्दनी अनुभव नीका। जहां देखे वहां राम सरीखा॥

Read more...

राम बिना कछु मानत नाही ! - संजीवसिंह सुळे, वडगांव

April 11, 2018 0
एप्रिल २०१३ च्या कृपासिंधु मासिकात प्रकाशित झालेला लेख

नेहेमीप्रमाणे उपासना केंद्रात सद्‌गुरु श्री बापूंच्या प्रवचनाची सी.डी.लावली होती. रामरक्षेवरील प्रवचनाची मालिका पुढे नेत असतांना एक एक ओवी बापू समजावून सांगत होते. आजचं प्रवचन‘कौसल्येयो दृशौ पातु’ हे होतं. 


कौसल्या म्हणजे काय? कौसल्येची दृष्टी म्हणजे काय?

हे आपल्या नेहेमीच्या सहज शैलीत सांगतांना बापू म्हणाले, 
‘‘राम वनवासातून परत येईपर्यंतच्या पूर्ण काळात कौसल्या एक निमिषभर सुद्धा डोळे उघडत नाही. अयोध्येतून बाहेर पडणार्‍या रामाचं जे रूप तिने डोळ्यात साठवून घेतलं होतं, त्याच स्वरूपाचं ध्यान तिने त्या संपूर्ण काळात केलं. आणि राम वनवासातून परत आल्यावर डोळे उघडून तिने सर्वप्रथम पाहिलं ते रामालाच ! उघड्या डोळ्यांनी असो वा बंद डोळ्यांनी, जागेपणी असो वा स्वप्नात, कौसल्या सतत ध्यान करते ते फक्त तिच्या रामाचंच ! आम्हाला रामाला जिंकायचं असेल तर कौसल्येच्या दृष्टीतूनच त्या रामाकडे पहावं लागतं. तरच साईसच्चरितात वर्णन केलेली "जागत रामा, सोवत रामा.." ही अवस्था प्राप्त होते.’’  

बापूंचं बोलणं ऐकता ऐकता मन नकळत साईसच्चरितात गेले. १९व्या अध्यायातील त्या ओळी डोळ्यासमोर दिसू लागल्या.  

गुरुकृपांजन पायो मेरे भाई  
राम बिना कछु मानत नाही॥

अंदर रामा बाहर रामा 
सपने में देखत सीतारामा॥

जागत रामा सोवत रामा  
जहा देखे वहां पूरनकामा ॥ 

एका जनार्दनी अनुभव नीका  
जहां देखे वहां राम सरीखा ॥

आणि मग साईसच्चरितातील, संत एकनाथांच्या ह्या ओळींचा अर्थ साईसच्चरिताच्याच आधारे शोधण्याची धडपड सुरू झाली. ह्या ओळींमधला ‘गुरुकृपांजन’ हा शब्दच इतका सुंदर आहे की केवळ ह्या एका शब्दावरच एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. 


गुरुकृपांजन म्हणजे काय?

आरंभी दाहक परंतु अंती शीतल असे अंजन जेव्हा डोळ्यात घातले जाते तेव्हा त्या अंजनाच्या प्रभावामुळे दृष्टी आपोआपच स्वच्छ होते, पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट दिसू लागते. आणि गुरुकृपा नेमकं हेच काम करते. प्रारब्धाच्या दाहक झळा सोसल्याशिवाय सहजासहजी न लाभणारी, किंबहुना केवळ ईश्‍वरकृपेनेच लाभणारी गुरुकृपा, एकदा का लाभली की मग गुरुच्या लाभेवीण प्रीतिचा शीतल झरा अखंड वाहू लागतो, असे हे गुरुकृपांजन.

गुरुकृपा आणि ईश्‍वरकृपा याचं हे परस्परावलंबीत्व साईसच्चरितात अगदी सुरुवातीलाच पाहायला मिळतं. दोन शब्द सांगतांना नागेश आत्माराम सावंत यांनी एकनाथी भागवतातल्या २२व्या अध्यायातील ओवी उधृत केली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे,

गुरुद्वारा पाविजे ज्ञान| तेथे ईश्‍वराचा आभार कोण| 
येथ ईश्‍वरकृपेवीण | सद्गुरुजाण भेटेना ॥

झालीया सद्गुरू प्राप्ती | ईश्‍वरकृपेवीण न घडे भक्ती |
सद्गुरु तोची ईश्‍वरमूर्ती | वेदशास्त्री संमत ॥

हे गुरुकृपांजन शाश्‍वत आणि अशाश्‍वत यातला फरक ओळखण्याची दृष्टी आम्हाला देते; सद्गुरु आणि ईश्‍वर अर्थात परमात्मा आणि परमेश्‍वर यातील साम्य ओळखण्याची दृष्टी आम्हाला देते. सद्गुरु तोची ईश्‍वरमूर्ती हे शाश्‍वत सत्य कळले की मग ‘प्रयास साध्य’ परमेश्‍वरापेक्षा ‘सहज साध्य’ परमात्माच आम्हाला अधिक भावतो. मंगलाचरणात अर्थात पहिल्याच अध्यायात हेमाडपंत म्हणतात की,  

हे साईनाथ स्वप्रकाश | आम्हा तुम्हीच गणाधीश|  
सावित्रीश किंवा रमेश | अथवा उमेश तुम्हीच ॥

तुम्हीच आम्हा ते सद्गुरु | तुम्हीच भवनदीचे तारू |
आम्ही भक्त त्यातील उतारू | पैल पारू दाविजे ॥

आता एकदा का हाच तो देव हे आम्ही स्वीकारले की मग त्याच्या ऐवजी अन्य कोणाचीही कल्पनाच आम्ही करू शकत नाही. 
राम बिना कछु मानत नाही ! मान्यच नाही ! रामाशिवाय अन्य कोणी आम्हाला मान्यच होऊ शकत नाही. 
४५व्या अध्यायात स्वत: साईनाथच आम्हाला निक्षून सांगतात,

संत सृष्टीमाजी उमाप | आपुला बाप तो आपुला बाप| 
साईमुखींचे हे करुणालाप | कोरा स्वहृदयपटावरी ॥

येस, माझा राम तो माझा राम, माझा साईराम तो माझा साईराम, माझा बाप तो माझा बाप ! बाप बिना कछु मानत नाही! आणि एकदा का हा दृढ निश्‍चय झाला की मग सुरू होते ते दृढ ध्यान, अखंड चिंतन, अविरत ध्यास! 


मनाच्या अवस्था 

आपल्या मनाच्या दोन अवस्था असतात. एक, अंतर्मन, आणि दुसरं, बाह्य मन. बरेचदा आम्ही बाह्य जगात बाह्य मनानेच वावरत असतो. ङ्गार थोड्या गोष्टी आमच्या अंतर्मनाला भिडतात. मात्र जेव्हा एखादी गोष्ट ही आतल्या आणि बाहेरच्या, अशी दोन्ही मनांकडून स्वीकारली जाते तेव्हा ती गोष्ट थेट हृदयात जाऊन उतरते. ‘अंदर रामा बाहर रामा’ ही साक्षात हनुमंताची अवस्था आहे. हे अवघड असेल, मात्र अशक्य नक्कीच नाही. कारण ‘त्यानेच’ मला ग्वाही दिली आहे की तू आणि मी मिळून शक्य नाही असं ह्या जगात काहीच नाही. हे कसं जमवायचं ते सांगतांना ३र्‍या अध्यायात हेमाडपंत सोपी युक्ती सांगतात, 

कृपण वावरो कवण्याही गांवा | 
चित्तासमोर पुरलेला ठेवा ॥

जैसा तयासी अहर्निशीं दिसावा |
तैसाची वसावा साई मनीं ॥

जमिनीत पुरलेलं ते गुप्तधन मिळवणं हेच एकमेव उद्दिष्ट त्या कृपणाचं असतं, तेच त्याचं ध्येय असतं, स्वप्न असतं. हृदयस्थ पुरलेलं ते रामधन मिळवणं हेच एकमेव उद्दिष्ट प्रत्येक श्रद्धावानाचं असतं, तेच त्याचं ध्येय असतं, स्वप्न असतं. सपने मे देखत सीतारामा ! हे स्वप्न पाहायचं असतं ते जागेपणी, उघड्या डोळ्यांनी ! त्या सीतारामाला प्राप्त करून घेणं हेच माझं स्वप्न असलं पाहिजे. स्वप्न म्हटलं की आधी आम्हाला आठवते ती झोप. पण इथे स्वप्न म्हणजे उद्दिष्ट असाच अर्थ अभिप्रेत आहे. मात्र संत एकनाथ आम्हाला सामान्य अर्थानेही हेच सांगतात की , तुम्ही जागे असा वा निद्रिस्त असा, चिंतन सुरू असेल ते फक्त रामाचेच. ‘कौसल्येयो दृशौ पातु’ ह्या वाक्याचा अर्थ बापूंनी जो सांगितला आहे तोच इथे नेमका लागू होतो. ‘जागत रामा, सोवत रामा!’ हीच गोष्ट स्पष्ट करून सांगताना ५२व्या अध्यायात हेमाडपंत सांगतात,

जागृती स्वप्न अथवा सुषुप्ति | 
तिहींमाजील कवण्याही स्थितीं ||

जाहलिया साईमय वृत्ति | 
संसार निवृत्ति काय दुजी ॥

इथे संसार निवृत्ती म्हणजे संसाराकडे पाठ फिरवणे नव्हे, तर, अवघाची संसार सुखाचा करीन ही वृत्ती होय. आणि सुख ह्या शब्दाचाच दुसरा अर्थ राम नव्हे काय ? संसार किंवा आम्ही ज्याला प्रपंच म्हणतो तो म्हणजे काय तर, सतत काहीना काही मिळवण्याची चाललेली धडपड, अनंत गरजा, कामना पूर्ण करण्यासाठीची धावपळ. पण आमचा संसारच मुळी जर रामासाठीच असेल, हा राम मिळवणं हीच आमची मनोकामना असेल तर मग हा सर्व संसार आपोआपच राममय होऊन जातो. संसारात ठायी ठायी भरून उरतो तो फक्त हा रामच. जहा देखे वहां पूरनकामा ! हा सुखाचा संसार कसा करायचा हे १ल्या, २३व्या व ३९व्या अध्यायात सांगतांना हेमाडपंत म्हणतात,
श्रवणे साईगुणश्रवण| मनें साईमूर्तीचे ध्यान|
चित्ते अखंड साईचिंतन| संसारबंधन तुटेल॥

चित्त साईनामस्मरणी | दृष्टी साईसमर्थचरणी|
वृत्ति साईध्यानधरणी | देह कारणीं साईंच्या ॥

चित्ते करा हरिगुरूचिंतन | श्रवणे करा चरित्र श्रवण| 
मनें करा ध्यानानुसंधान | नामस्मरण जिव्हेने ॥

चरणी हरिगुरूग्रामागमन | घ्राणी तन्निर्माल्याघ्राणन|
हस्तीं वंदा त्याचे चरण | डोळा घ्या दर्शन तयाचे॥

अशा पद्धतीने प्रयास केल्यास तो सापडतोच अशी स्पष्ट ग्वाही संत एकनाथ महाराज देत आहेत. अनुभव निका! स्पष्ट अनुभव आहे हा! उगीच सांगायचं म्हणून एकनाथ महाराज सांगत नाहीत. त्यांनी जे सांगितलं तो त्यांचा अनुभव सांगितला आहे. कारण मुळात राम हा अनुभवण्याचाच विषय आहे. साईसच्चरितात त्या मद्रासी भजनी मंडळातील बाईने जसा तो जानकी जीवन धनुर्धारी राम अनुभवला अगदी तस्सा! हा राम अनुभवला की मग जो अनुभव येतो तो म्हणजेच ‘जहां देखे वहां राम सरीखा!’ बाळाराम मानकरांनी नाही का त्या सापात सुद्धा बाबांनाच पाहिलं, तसा भाव माझ्याही मनात उमटू शकतो, तसा अनुभव मी ही घेऊ शकतो. १५व्या व २०व्या अध्यायात स्वत: साईनाथ आम्हाला सांगतात की,

ऐसा तुम्हां हृदयस्थ जो मी| तयासी नमा नित्य तुम्ही|
भूतमात्रांच्याही अंतर्यामी | तोच तो मी वर्ततो ॥

यास्तव तुम्हास जो जो भेटे | घरी दारी अथवा वाटे |
ते ते ठायी मीच रहाटें | मीच तिष्ठें त्यामाजी॥

कीड मूंगी जलचर खेचर | प्राणीमात्र श्‍वान शूकर |
अवघ्या ठायी मीच निरंतर | भरलो साचार सर्वत्र॥

असे मी भरलो सर्वांठायी | मजवीण रिता ठाव नाही |
कुठेही कसाही प्रकटे पाही | भावापायीं भक्तांच्या ॥

शेवटी हा भावच तर महत्वाचा असतो ! माझ्या आयुष्यातील रामाचा अभाव दूर करण्यासाठी भक्तीचा हा भाव असणं फार गरजेचं आहे. आणि हा भाव उत्पन्न करण्याचा नितांत सुंदर मार्ग ११व्या अध्यायातील ११वी ओवी आम्हाला दाखवते.
न करिता सगुणाचे ध्याना| 
भक्तिभाव कदा प्रकटेना॥ 

आणि सप्रेम जंव भक्ति घडेना | 
कळी उघडेना मनाची॥

संत एकनाथांनाही हेच सांगायचे आहे की, गुरुकृपांजन मिळाले की डोळे उघडतात, आणि डोळे उघडले की मग मनाची कळी उघडायला वेळ तो काय? मनाचं हे असं कलिका पुष्प उन्मीलन झालं की मग मानव जीवात्मा उद्धारक श्रीरामचंद्राचा अनुभव हा येतोच. माझ्या श्रीरामचंद्राकडे  ह्या उघड्या डोळ्यांनी पाहता पाहता अजून एक गोष्ट लक्षात येते व ती म्हणजे, मी जसा माझ्या रामाकडे पाहतो तसा हा माझा राम सुद्धा सदैव माझ्याचकडे पहातो आहे !

....ज्या उघड्या डोळ्यांनी मला ह्या सगुणाचे, ह्या सावळ्याचे, ध्यान करायचे आहे, त्या डोळ्यांचे रक्षण हा कौसल्येचा राम करो हीच रामनवमीनिमित्त प्रार्थना !
Read more...

How We Celebrate Ramnavami Utsav?

April 11, 2018 0
Lord Ram was born on Chaitra Navmi. Ram means Happiness, Ram means Synergy, Ram also means Restraint and Ram means a Role Model. Since 1996, every year, Shree Aniruddha Upasana Foundation celebrates Ramnavmi with much happiness, enthusiasm and in an environment that is full of devotion

Shree Sahastradhara Abhishek:


Shriram-navami-utsav-sahastradhara-abhishek-renukamata
Sahastradhara Abhishek on Renuka Mata on Ramnavami











Sahastradhara Abhishek is performed by chanting mantras on 'Renukamata’s Tandala' by using a special Abhishekpaatra. It is indeed a great opportunity for all Shraddhavans to watch the Abhishek Sohala and listen to the mantras chanted.

Shree Sairam Sahastra Yadnya:



shriram-navami-sai-ram-sahastra-yadnya
Aniruddha Bapu along with family taking darshan of Shree Sairam Sahastra Yadnya at Ramnavami Utsav

In the morning, the ritual of Yadnya starts. This Yadnya is called ‘Shree Sairam Sahastra Yadnya’. Shree Deepshikha is brought from Sai Niwas to the venue. Every devotee can make an offering while chanting the Tarak Mantra. Due to the offerings, one’s body and mind obtain positive vibrations. Similarly, because the Mind also gets strengthened, the sins of one’s previous births get eradicated as well. ‘Aapatti Nivarak Sameedha’ is available during this Yadnya.

Shree Ramvaradayini Mahishasurmardini Navaratri Poojan:



shri-ramvardayini-mahishasurmardini-navaratri-pujan

With the blessings of “Aadimata Mahishasurmardini”, Ram’s victory over Ravan was achieved. This story has been narrated in detail by Shree Aniruddha in Shree Matruvatsyalavindanam. Thus, the Poojan of ‘Shree Ramavardayini Aadimata Mahishasurmardini’ is performed on this day.

Ramjanma (The Event Of Birth Of Lord Shree Ram):



Ram-janma-ramnavami
All shraddhavan ladies celebrating Ram Janma and His Naming ceremony in presence of Sadguru Aniruddha
In the presence of Sadguru Shree Aniruddha, at 12 O’ clock noon the occasion of Shree Ramjanma is celebrated in a traditional way. The Cradle that was used for Bapu when he was a baby is used for performing this festivity. Ladies and Gents both swing thePalna (cradle) while singing “Kuni Govind Ghya Kuni Gopal Ghya….” song (Ramjanma – Palna (i.e. lullaby sung for Lord Shree Ram)). After this, the naming ceremony of Ram takes place and “Sunthavada” is distributed as Prasad (Communion). This Cradle is kept on the stage the whole day for devotees to pay their respects to.

Shree Sai Satpoojan:



sai-sat-pujan-ramnavami
Aniruddha Bapu taking darshan at Shree Sai Satpoojan at Ramnavami
Three things, viz, ‘Rudraksha garland, Trishul and Shaligram’ which were given byShree Sainaath to Hemadpant (writer of Shri Sai satcharitra) are then brought to the venue for Poojan. People keep chanting ‘Shree Ghorakashtodharan Stotra’ the whole day and perform ‘Shree Saisat Poojan’ as well.

Shree Sainath Mahimnaabhishek:



sai-abhisekh
Shree Sai Sadashiv Idol
An Abhishekh is performed on the Idol of Shree Sainath called “Shree Sai Sadashiv Idol.” This ritual is performed through the process of ‘Shree Sainath Mahimnabhishek.’ Every devotee can participate in performing this Abhishek. This Abhishek is particularly useful and beneficial for the health of all members of a family and in particular for children of the household.

Talibharan:



sai-talibharan-vidhi
Aniruddha Bapu Performing Sai Talibharanvidhi

Talibharan is performed on the day of Ramnavami. Talibharan is initiated by Sadguru Shree Aniruddha. In the midst of various musical instruments and while chanting ‘Shree Sairam jap’ (“Raksha Raksh Sairam”) this ritual is performed. When one performs Talibahran, one gets as much blessings as one would get after feeding 5 hungry souls. Similarly, the Prasad (Communion) is the most sought after among the nine types of Prasad (Communions). The participation in this event also is equally important.

Akhand Jap:

sairam-akhandajap
“Om Ramaay Rambhadray Ramchandray Namah
On the auspicious day of Ramnavami, a mantra “Om Ramaay Rambhadray Ramchandray Namah” is chanted continuously all through the day. This ritual is also performed in the presence of Sadguru Shree Aniruddha. All those who chant this mantra put Bukka on each other’s forehead first by greeting that person with a Namaskar. 
The sentiments are supreme behind this action. The person on whose forehead the Bukka is applied symbolizes Bhakta shrestha Pundalik and the person who applies Bukka, also uses his hands which are symbolic of the hands of Bhakta Shrestha Pundalik. With these sentiments all those who sit for chanting apply Bukka on each other’s forehead and then start the chanting. All those who witness this, derive immense and unique happiness.

Sai Satcharitra Adhayayan Kaksha:

saicharitra-adhyayan-kasha
Saisatcharitra Adhyayan aadyapipa Kaksha

For this event, a separate area is demarked as “Aadyapipadada” Section. In this section continuous reading of Sai Satcharitra is performed. Aadyapipadada is none other than Shree Sureshchandra Pandurang Dattopadhye. An ardent devotee of Shree Sainath and a true follower of Bapu! 
Every year, he used to perform Parayan of ‘Shree Sai satcharitra’ four times i.e. onRamnavami, Gurupoornima, Krushnashtami, and Dassera. This was his regimen for almost 60 years. He used to end his reading of a week in the afternoon on the day of Krushnashtami. He left for heavenly abode exactly on the day of Krushnashtami. This is the Abhisamvahan of Sainath that he performed all through his life. As described in the 11th chapter, “Akahand Ram Ladhal” turned out to be true in his life. Every devotee who enters this section resolves to try to become a devotee like him before he begins reading chapters from ‘Shree Sai Satcharitra’.

Shree Aniruddha Handi Prasad:

handiprsad-ramnavami
Handi Prasad at Ramnavami

On this auspicious day, every devotee can benefit from obtaining Prasad that is touched and blessed by Shree Aniruddha Bapu himself. While this is being cooked, Bapu himself adds the required ingredients to the Handi (Big Pot) and he himself stirs it as well. This is the most unique thing about this Prasad. This Handi Prasad reminds every one of the Handi Prasad as described in ‘Shree Sai Satcharitra’. This Prasad not only tastes unique but the taste is indescribable as well. Each and every devotee does not leave the venue unless he takes this Prasad. 

In the night, after the culmination of ‘Shree Sairam Sahastra Yadnya’ and after ‘Mahaarti’ this festival comes to an end. Every devotee can individually, personally participate in this unique festival celebrated on the day of Ramnavami.
Read more...